गोंदिया : गोंदिया शैक्षणिक संस्था संचलित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजान नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंजन नायडू यांनी गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या व्यक्तिमत्त्वावर व चरित्रावर प्रकाश टाकताना सांगितले की, युवकांनी त्यांचे विचार जीवनात आत्मसात करावे, दोन्ही महान व्यक्तींनी देशावर प्रभाव टाकला आहे. आपल्या कृतीतून आणि विचारांनी जगावर. जगभरातील लोकांच्या मनावर अमिट छाप सोडली आहे. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ.स्नेहा जैस्वाल अध्यक्षस्थानी असून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.