काॅलम व बेसशिवाय देवरी ग्रामीण रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम

0
16

देवरी,दि.13ः- देवरी ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पणाला घेऊन आजी माजी आमदरांनी श्रेयवादाची लढाई केली.या लढाईमुळे आरोग्ययंत्रणा कामाला लागत ग्रामीण रुग्णालय सुसज्ज करायला लागली.मात्र त्या नादात गुणवत्तेला वेशीवर टांगत बांधकाम विभागाच्या आर्शिवादाने कंत्राटदाराने रुग्णालयाच्या सुुरक्षा भिंतीच्या बांधकामात कुठलेही काॅलम आणि बेस तयार न करताच बांधकाम सुरु केल्याने त्या सुरक्षा भिंतीच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.कुठल्याही व्यक्तीने जोराने धक्का दिल्यास पायव्याला आधार नसलेली ही सुरक्षा भिंत कधीही कोलमडून पडू शकते असे चित्र भिंतीच्या सुरु असलेल्या  बांधकामाकडे बघितल्यास दिसून येत आहे.या गुणवत्ताहिन सुरक्षा भिंतीच्या मुद्यावर कुठला लोकप्रतिनिधी बांधकाम विभागाला धारेवर धरतेय याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.