तिरोडा:-भजेपार येथील शेतकरी सुनील हरी कोडवते सप्टेंबर महिन्यात शेतात धानाच्या सुरक्षेकरिता झाडावरील फांद्या तोडण्याकरिता चढला असता त्याचा तोल जावून खाली पडल्याने कंबरेला जबर मार लागला. उपचाराकरिता त्यांना गोंदिया येथील सेन्ट्रल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तसेच सदर घटनेची नोंद पोलीस ठाणे तिरोडा येथे दाखल करण्यात आली. सदर कुटंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आमदार विजय रहांगडाले यांचेकडे समस्या सांगितले असता तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत सदर रुग्णाची शिफारस करण्यात आली व १५ दिवसात उपचाराकरिता १ लक्ष रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर करण्यात आले. त्यामुळे सुनील कोडवते यांच्या उपपचारकरिता मदत झाली असून आमदार महोदयांचे आभार मानले आहेत. सदर प्रकरणाकरिता जी.प.सदस्या तुमेश्वरी बघेले, डॉ.तारेन्द्र बिसेन भजेपार, प.स.सदस्य तेजराम चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.