प्रसिद्ध समाजसेविका सविता बेदरकर यांची अग्नी पीडितकुटुंबाला मदत

0
8

तिरोडा- तालुक्यातील मेंदीपुर येथील अग्नि पीडित लालचंद चचाने यांना प्रसिद्ध समाजसेविका सविता बेदरकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मदत केली.नऊ तारखेला मेंदीपूर येथील चचाने यांचे राहते घर आधीच्या भक्ष स्थानी पडले व त्यांच्या उभ्या संसाराची ओळख रांगोळी झाली. गोंदिया येथे प्रसिद्ध समाजसेविका सविता बेदरकर यांनी त्यांच्या घरी भेट देऊन चचाने कुटुंबाच्या वेदना जाणून घेतल्या. तसेच त्यांची पत्नी सुग्रता चचाने यांना ६० किलो तांदूळ, ५ किलो तेल, कपडे व पाचशे रुपये रोख मदत केली. आणि दिवाळी ला पुर्ण कुटुंबाला नवीन कपडे व दिवाळीच्या फराळाची व्यवस्था करेल असे वचन दिले.याप्रसंगी सविता बेदरकर, स्वाती आगाशे, पत्रकार नितीन आगाशे व राजेंद्र पटले उपस्थित होते.