माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वृत्तपत्र दिन’ म्हणून साजरा

0
6

कलाम साहेबांचा संघर्ष, आदर्श प्रेरणादायी: खेमेंद्र कटरे

गोंदिया :-मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेब यांचा वाढदिवस रविवारी १५ ऑक्टोबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील वृत्तपत्र वितरण केंद्रात ‘वृत्तपत्र दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संपादक खेमेंद्र कटरे व महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघाचे सचिव दिनेश उके यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब यांच्या छायाचित्रा ला पुष्पहार अर्पण करून शुभेच्छांची देवाण घेवाण करण्यात आली. या प्रसंगी मिठाई चे वितरण करीत
वृत्तपत्र विक्रेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संपादक खेमेंद्र कटरे यांनी आपल्या भाषणात मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला आणि सांगितले की, सुरुवातीच्या काळात त्यांचे जीवनात, कलाम साहेब चेन्नई शहरातील एका चौकात
वृत्तपत्रे विकून संघर्ष करत जीवन सुरू केले. यानंतर उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी संशोधन क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला. ते भारताचे महान संशोधक झाले. ते देशात इतके प्रसिद्ध होते की, देशाच्या सरकारने त्यांना भारताचे राष्ट्रपती केले. आमचे कलाम साहेबांचा लढा व प्रेरणादायी विचार आपल्या जीवनात आणून वृत्तपत्र विक्रेते बांधवांनी आपले जीवन प्रगतीशील बनविण्याचा विचार करावा, असे मत यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन पत्रकार संजय राऊत यांनी केले. यावेळी गोंदिया जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रमोद भोयर, दिनेश उके, दुर्गा प्रसाद अग्रहरी, राजेश वैद्य, जावेद अन्सारी, पोलीस पाटील प्रवीण कोचे, हर्षदीप उके, पियुष सोनवणे, अनिमेष रामटेके, शैलेंद्र ठाकूर, राजू ठाकूर, सचिन अवचट, हरजित वाढई, तुषार,बारेवार, हेमंत हलमारे, रमेश भोयर, रमाकांत वैद्य, आर्यन, अमित गणवीर, कामेश सेलोकर, महेश तरोणे, राजेश कडव, राजेश साठवणे, विजय राऊत, कमलेश भोयर, अजय यादव, दत्ता गजभिये, प्रवीण वासनिक, जयेश गजभिये, प्रकाश साखरे, रामू शरणागत आदी वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.