अर्जुनी मोर(सुरेंद्रकुमार ठवरे)- तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशनच्या “गाव तेथे ग्रंथालय” या उपक्रमाअंतर्गत केशोरी पोलीस स्टेशन येथील वाचनालयात स्पर्धा परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.पोलीस स्टेशन केशोरीचे ठाणेदार सोमनाथ कदम यांच्या हस्ते वाचनालयात नविन “डिजीटल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केन्द्रा”चे उद्घाटन करण्यात आले.
तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नविन आवृतीच्या पुस्तकांचे वाटप देखील करण्यात आले.सदरवेळी उपस्थीत विद्यार्थ्यांना ठाणेदार सोमनाथ कदम यांनी मार्गदर्शन करून सदर वाचनालयातील पुस्तकांचे नियमित वाचन करून, येणा-या स्पर्धा परिक्षा उत्तमरित्या पास करून शासनाच्या विविध विभागात सेवा द्यावी असे आवाहन केले.तयार केलेल्या डिजीटल मार्गदर्शन केन्द्राच्या माध्यमातून अभ्यास करून यश संपादन करावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
केशोरी पोलीस स्टेशनच्या “गाव तेथे ग्रंथालय” या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणेदार सपोनि. सोमनाथ कदम, पोहवा. सुशिल रामटेके, पो.शि.नितीन डुंभरे हे नक्षलग्रस्त व अतीदुर्गम आदिवासी भागातील युवकांना स्पर्धा परीक्षेबाबत जागरूकता निर्माण करून नक्षल चळवळीपासून दूर होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करीत आहोत.
सदर उपक्रम पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सोमनाथ कदम, पोहवा. सुशिल रामटेके, पो.शि.नितीन डुंभरे यांनी यशस्वीरित्या राबविला.