अर्जुनी मोरगाव-तालुक्यातील खांबी येथील युवा एकता ग्रुपच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्ताने रक्तदान आणि रोगनिदान शिबिराचे आयोजन मंगळवारला स्थानिक सार्वजनिक हनुमान मंदिरात करण्यात आले होते.या शिबिरात परिसरातील 20 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. आयोजित रोगनिदान शिबिरात 251 रुग्णांची तपासणी करण्यात आली.सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात.रक्तसंकलन प्रक्रिया भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ.विनय ढगे, राहुल गिरी,लोकेश क्षीरसागर,तृप्ती गभने, कल्पना येवले आणि चमूने केली.रुग्णतपासनी करिता आरोग्य उपकेंद्र चांना बाकटी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.कुंदन कुलसुंगे,डॉ.पूजा गजभिये, शिंदे,राजगिरे,एस.बी.बनकर,कोमल रामटेके यांनी पार पाडली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुनील पाऊलझगडे,सदानंद भोंडे,विष्णू डोये,शुभम बाहेकार, प्रशांत खोटेले, महेश कोरे,कमलेश शेंडे,नूतन डोये,पुरुषोत्तम डोये,निखिल खोटेले, मेघराज खोटेले आणि मंडळाच्या सदस्यांनी केले.