वीज कामगार अधिकारी अभियंता ७ जून रोजी संपावर

0
17

गोंदिया : महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते व अधिकारी संयुक्त कृती समितीची बैठक कोल्हापूरात पार पडली असून बैठकीत ७ जून रोजी संपवार जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सॉबर्डिनेट इंजिनीयर्स असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ, महाराष्ट्र राज्य विद्युत क्षेत्र तांत्रीक कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रीक कामगार संघटना व महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉंग्रेस या संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत उर्जा मंत्र्यासोबत ११ जानेवारी रोजी तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक व वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत संघटनांच्या कृती सोबत झालेल्या वाटाघाटी व सहमतीनंतरही अंमलबजावणी झाली नाही. शिवाय व्यवस्थापनाच्या कामगार विरोधी धोरण, बदली, अभियंता व अधिकारी यांच्यांवर एकतर्फी निर्णयाने अभियंते व अधिकार्‍यांत असंतोष निर्माण झाला असून त्यावर चर्चा करण्यात आली.
यावर कृती समितीने ७ जून रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. तसेच संपाच्या तयारीसाठी सर्व पावर स्टेशन, झोन, सर्कल, विभागीय कार्यालयासमोर २६ मे, २ जून व ६ जून रोजी गेट मिटींग व निदर्शने करण्यात येणार आहे. करिता गुरूवारी (दि.२६) दुपारी १.३0 वाजता परिमंडळ कार्यालयासमोर अभियंता, अधिकारी, कर्मचार्‍यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीकडून हरिष डायरे, विवेक काकडे, राजू गोंधरे, योगेश्‍वर सोनुले यांच्यासह समितीतील पदाधिकार्‍यांनी केले आहे.