दसरा निमित्त महात्मा लंकापती रावण पूजा संपन्न

0
7

गोंदिया : दसरा निमित्त राणी दुर्गावती स्मारक पुजारीदेव देव ठाण पुजारीटोला (तुमखेडा) आदिवासीचे आराध्य दैवत महात्मा राजा रावण मडावी यांचे पूजन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला मुख्य पुजारी पुरणलाल वाढवे यांच्या हस्ते प्रथम महात्मा रावण ,ग्राम देवता, पारीकुपारलिंगो, डॉ बाबासाहेब अंबेडकर व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.करण टेकाम अध्यक्ष पीपल्स फेडरेशन गोंदिया, अनिल वट्टी व शत्रुघ्न मरसकोल्हे व प्रा. नीलकंठ चीचाम यांनी उपस्थित आदिवासी बांधवाना मार्गदर्शन केले . यावेळी आदिवासी महापुरुष व राजांना कशाप्रकारे डावलून इतर काल्पनिक देवी देवतांना पुढे आणण्याच्या कटकारस्थान मनुवादी मार्फत करण्यात आले. मुलांना शिक्षणाचा प्रवाहात कशा प्रकारे आणता येईल त्याचे स्पष्टीकरण देऊन मार्गदर्शन करण्यात आले.ममता शेखर वाढवे जि प सदस्य , ओमप्रकाश परतेती (पोलीस पाटील ), शेखर वाढवे, नोकचंद वाढवे , दिनेश वाढवे, हरसराम परतेती , मुन्नालाल परतेती , कमलेश्वर वाढवे, वीरेंद्र वाढवे, देवेंद्र ऊईके,जितू वाढवे,बसंत वाढवे,विनोद वाढवे,सागर परतेती ,धनंजय उइके,प्रवीण परतेती , अजय वाढवे, विजय वाढवे,आकाश धुर्वे ,अनिल परतेती व पुजारीटोला तुमखेडा गावातील आदिवासी समाज बांधव बहु सख्येने उपस्थित होते.