ज्ञान दान हे सर्वश्रेष्ठ दान:- इंजि यशवंत गणविर

0
15

अर्जुनी मोरगाव,दि.२८- आजचे युग हे स्पर्धेचे, विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे आणि आजच्या या युगात टिकून राहण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे.आज इथे आपण केलेल्या उल्लेखनीय कार्याची पावती म्हणून आपला सत्कार करण्यात आला.पण आपण इथेच न थांबता शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानदानाचे कार्य करत रहावे कारण ज्ञान दान सर्वात श्रेष्ठ दान असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ते येथील उमेद भवन येथे आयोजित तालुका मुख्याध्यापक संघाच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले,आपण आपल्या कार्यकाळात अनेक गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले.प्रत्येक क्षेत्रात आपल्या हातुन घडलेले विद्यार्थी कार्य करत आहेत ते क्षेत्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असतील आणि स्वतः चे,गावाचे नावलौकिक करत असतील हिच आपल्या सेवानिवृत्तीची खरी पावती आहे.असे समजुन पुढेही आपले कार्य सुरू ठेवावे.असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षणाधिकारी (माध्य) कादर शेख, पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, गटशिक्षणाधिकारी रुषी मांढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत परशुरामकर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष दुर्गाप्रसाद पटले, तालुकाध्यक्ष सुनिल पाऊलझगडे, सामाजिक कार्यकर्ते आर.के.जांभुळकर, माजी पंचायत समिती सदस्य जनार्धन काळसर्पे,तालुका मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, सर्व मुख्याध्यापक, सेवानिवृत्ती मुख्याध्यापक उपस्थित होते.