कचारगड येथे भक्त निवासाचे भूमिपूजन थाटात

0
18
वाढदिवसाच्या शुभेच्छा

सालेकसा-भारतीय राज्यघटनेच्या कलम २७५ (१) नुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत सालेकसा तालुक्यातील कचारगड येथील काली कंकाली पारी कोपार लिंगो देवस्थान संकुल येथे 2 कोटी 23 लाख रुपयांच्या निधीतून मंजूर झालेल्या भक्त निवासाचे भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्राचा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते व ग्राम पंचायत बाकलसर्रा सरपंच सौ. सिंधुताई घरत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

कार्यक्रमात नॅशनल पीपल्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष आदिवासी सेवक एन,डी, किरसान, माजी आमदार संजय पुराम, आदिवासी महामंडळ नाशिकचे संचालक भारत दुधनांग, पंचायत समिती सभापती सौ, प्रमिला गणवीर, जिल्हा परिषद सदस्य गीताबाई लिलारे, पंचायत समिती सदस्य अर्चना मडावी, सुनीता राऊत, आदिवासी उपायुक्त कोडवते, प्रकल्प अधिकारी- विकास लाचेलवार, सालेकसा तहसीलदार नरसय्या कोंडाकुर्ले, किरण टेकाम, छायाबाई टेकाम, सामाजिक कार्यकर्ते सावलराम बहेकार, यादनलाल बनोठे, इत्यादि मंडळी मंचावर उपस्थित होते.

कचारगड देवस्थान हे आदिवासी संप्रदायाचे प्रेरणास्थान असून गोंडवाना भूमि काळापासून याचे जागतिक महत्व आहे. याशिवाय आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुहा असल्याने पर्यटन दृष्टीने महत्व प्राप्त आहे. त्यामुळे संपूर्ण भारतातून आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येत येथे भेट देतात. याशिवाय विदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक विशेष भेट देण्यास येतात. त्यामुळे या ठिकाणी इतर धर्माचे हस्तक्षेप आणि देवस्थान स्थापन होवू नये केवळ आदिवासी समाजाचे इतिहासिक वारसा जपण्यासाठी शासनाने या ठिकाणी ५० हेक्टर जागा राखीव करून संरक्षण करण्याची मागणी आयोजकांनी यावेळी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना केली.

सर्व पाहुण्यांचे स्वागत समितीचे अध्यक्ष दुर्गा प्रसाद कोरोटे, रमण सलाम, मनीष पुसाम, रामेश्वर पांढरे, बरेलाल वरकडे, सकुंतला पार्टे, विजेंद्र मसराम, रमेश वाढवे, भोजराम मसराम, लखन टेकाम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन राधेश्याम टेकाम, प्रास्तविक दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी केले तर आभार जगदीश मडावी यांनी मानले.