अर्जुनी मोरगांव:-केशोरी पोलीस स्टेशनच्या वतीने कम्युनिटी पोलिसिंगच्या अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकी योजनेच्या मार्फतीने ग्रामभेट घेऊन नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाते.
मौजा परसटोला गावातील अल्पभूधारक शेतकरी यशवंत सिताराम वाघमारे यांना विहीर बांधकाम करण्याकरिता निधीची आवश्यकता होती. पोलीस स्टेशन केशोरीच्या वतीने त्या शेतकऱ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने बाबत माहिती देण्यात आली. तसेच त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सविस्तर माहिती ऑनलाइन पद्धतीने शासनाला सादर करण्यात आली.
केशोरी पोलिसांनी सततचा पाठपुरावा केल्यानंतर यशवंत सिताराम वाघमारे रा. परसटोला यांना विहीर बांधकामासाठी शासनातर्फे निधी मंजूर झालेला आहे.केशोरी पोलीस स्टेशनने केलेल्या मदतीमुळे गरजू शेतकऱ्याच्या कुटुंबात आनंद निर्माण झालेला आहे तसेच गावकऱ्यांनी देखील पोलिसांचे आभार मानलेले आहेत.
सदर उपक्रम निखिल पिंगळे पोलीस अधिक्षक गोंदिया, अशोक बनकर अपर पोलीस अधिक्षक गोंदिया,संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सोमनाथ कदम,पो.उप.नि प्रताप बाजड, पोहवा. सुशिल रामटेके, मपोहवा. पुनम हरिणखेडे, म.पो.शि.निशा बोंद्रे यांनी यशस्वीरित्या राबविला.