40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ देवरी येथे दमा या आजारावर मोफत औषध वितरण शिबीर संपन्न

देवरी येथे दमा या आजारावर मोफत औषध वितरण शिबीर संपन्न

0
33

blank

– सुवर्णप्राशन फाऊंडेशन आणि दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम
– ४४५ गरजू रुग्णांनी घेतला सहभाग

देवरी,दि.३० – येथील माँ धुकेश्वरी मंदिराच्या सभागृहात सुवर्णप्राशन फाऊंडेशन,दिनबंधू ग्रामीण विकास संस्था आणि माँ धुकेश्वरी मंदिर समिती देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने दमा,जुनाट सर्दी अस्थमा अश्या प्रकारची आजार बरे होण्यासाठी मोफत आयुर्वेदिक औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या २ वर्षांपासून या शिबिराचे आयोजन केले असून या शिबिराला रुग्णांचा उत्सुर्फ प्रतिसाद मिळत आहे. गोंदिया,भंडारा,गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यातील सुमारे ४४५ रुग्णांना या शिबिराचा लाभ झाला. आयुर्वेदाचार्य सुनील समरीत यांच्याकडून या रुग्णांची चिकित्सा करून ३३६ रुग्णांना दमा या आजाराच्या औषधीचे मोफत वितरण माँ धुकेश्वरी मंदिर समितीचे अध्यक्ष मा.ॲड.प्रशांत संगीडवार, मंदिर समितीचे सचिव सुशील शेंद्रे, सुवर्णप्राशन फाउंडेशनचे संस्थापकअध्यक्ष मा.आयुर्वेदाचार्य सुनील समरीत,बिरसा ब्रिगेडचे संघटक मा.चेतन उईके, जि.प.कर्मचारी पतसंस्थेचे संचालक विनोद चौधरी, गोंदिया शिक्षक पतसंस्थेचे संचालक राजेश रामटेके, दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मा.कुलदिप लांजेवार, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष विनोद चौधरी, सुवर्णप्राशनचे विश्वस्त शरद समरीत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. शरद पौर्णिमा आणि दमा या आजाराचा निकटचा संबंध असल्याने आणि दिवसेंदिवस हे आजाराची लागण वाढत असल्याने दरवर्षी कोजागिरी पोर्णिमेच्या दिवसी हे शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

शिबिराच्या आयोजनासाठी सुवर्णप्राशन फाऊंडेशनच्या सहसचिव सौ.हितेश्री समरीत, दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे सचिव कल्याणी लांजेवार, विश्वस्त दिपक लांजेवार,संस्थेचे स्वयंसेवक हर्षवर्धन मेश्राम,नागेश कसोंदि,गोपाल चनाप,मनोज कोडापे यांच्या सह मंदिर समिती आणि दोन्ही सामाजिक संस्थेच्या विश्वस्त आणि स्वयंसेवकांनी यांनी सहकार्य केले.