. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 च्या तरतुदींची सविस्तर माहिती
गोंदिया, दि.31 : अन्न व औषध प्रशासन विभाग, गोंदिया यांच्या वतीने व एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प-गोंदिया यांच्या सहकार्याने तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी आयोजित FOSTAC (Food Safety Training & Certification ) प्रशिक्षण कार्यशाळा 30 ऑक्टोबर 2023 रोजी उत्साहात यशस्वीपणे संपन्न झाली.
सदर प्रशिक्षणाचा लाभ तालुक्यातील 370 अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका व 13 अंगणवाडी बीट पर्यवेक्षिका यांनी घेतला. सदर प्रशिक्षण FSSAI (फसाई) या केंद्र शासनाच्या स्वायत्त संस्थेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना उपलब्ध करून देण्यात आले. प्रशिक्षणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 च्या तरतुदी व नियम, खाद्य सुरक्षा, वैयक्तिक व परिसर स्वच्छता, अन्न भेसळीचे दुष्परिणाम व भेसळ ओळखण्याच्या पद्धती, घरातील व बाहेरील सुरक्षित व ताजे अन्नपदार्थ खाण्याचे फायदे, घरातील खाद्यपदार्थ सुरक्षा, अन्न सुरक्षा प्रमाणपत्र व रजिस्ट्रेशनची आवश्यकता आदी विषयावर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. सोबत सर्व प्रशिक्षणार्थींना यावेळी अन्न सुरक्षा प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात आले. सदर प्रशिक्षण डॉ.अश्मिता ठवकर (न्युट्रिशनल फुड ट्रेनर, नागपूर) यांनी अंगणवाडी सेविकांना दिले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन पं.स.गोंदिया गटविकास अधिकारी आनंदराव पिंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी शितल देसपांडे, न्युट्रिशनल फुड ट्रेनर नागपूर डॉ. अस्मिता ठवकर, फुड सेफ्टी मित्र नागपूर जयंतकुमार शहारे, बालविकास प्रकल्प अधिकारी गोंदिया नरेश सोनटक्के, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प-गोंदिया 01 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) तिर्थराज उके, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प-गोंदिया 02 कुसुम सिरसाम उपस्थित होते.