अर्जुनी मोरगाव,दि.15– बहुजनाच्या मातृसत्ताक व्यवस्थेतील महानायक ,महासम्राट, बळीराजाचा उत्सव भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आनंदोत्सवाच्या सण दिवाळीला साजरा करतो .कृषी संस्कृतीचा महानायक, कुलस्वामी, प्रजाहितदक्ष, महादानशूर, महापराक्रमी 3 हजार वर्षांपूर्वीच्या बळीराजाचे आपण सर्व वंशज आहोत .आज ईडा पिडा टळू दे बळीचे राजे येऊ दे असे म्हणतो. बळीराजाच्या प्रतिमेचे पूजनांनी बळीराजा कोण याची प्रचिती आपणा सर्वांना आली असल्याचे प्रतिपादन उद्धव मेहंदळे यांनी केले.
ईटखेडा येथील बाजार चौकात गोधन पुजनाचे वेळी महासम्राट बळीराजाचे बॅनर व फोटोचे पूजन उद्धव मेहंदळे ,छबील बुराडे, मोरेश्वर भावे गुरुजी,बळीराम मडावी, दिनेश घोरमोडे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .यावेळी पारंपारिक वाद्य डफळीचे तालावर गोधनाची पूजा करण्यात आली. फटाक्याची आतिबाजी करून पहिल्या दिवाळीला आलेले नवरदेव नवरी यांनी सुद्धा पुजनानंतर आनंदोत्सव साजरा केला.
आबालवृद्ध, युवावर्ग, महिलामंडळींनी मोठ्या संख्येत उपस्थित दर्शवून प्रथामताच गावात फोटो पूजन करून त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. यावेळी सरपंच आशाताई इंद्रदास झिलपे, बेबीबाई शीलार ,मायाबाई धांडे ,वासुदेव अनवले, संजय मैंद, विलास भावे, पांडुरंग गोटे वासुदेव गिरीपुंजे, सुभाष मेश्राम, देवराव दुपारे, श्रावण सोंदळकर ,येणूबाई कांबळे ,तुलाराम झिलपे, तुकाराम मडावी, हरिदास प्रधान ,खुशाल अनवले, नंदकुमार अनवले ,मंगेश चव्हाण , रमेश मिसार,वासुदेव गोठे, देवराम वलथरे, मोरेश्वर मीसार, नीलकंठ ढोरे ,विलास मैंद, भजनलाल लोणारे ,गोपीनाथ मैंद शिवराम शिलार देवराम रोकडे व मोठ्या संख्येत ईटखेडा येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सर्वेश धांडे तर उपस्थित सर्वांचे आभार रमेश कुंभरे यांनी मानले.