गोठणगाव येथे आधार भुत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

0
11

अर्जुनी मोर.दि.१८- आदिवासी विविध सेवा सहकारी संस्था मर्यादित गोठणगाव येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या शुभहस्ते, आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे संचालक भरतसिंग दुधनाग यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
आदिवासी विकास महामंडळ नाशिक द्वारा संचालित आदिवासी विविध सेवा सहकारी संस्था मर्यादित गोठणगाव येथे आज पासून धान खरेदीला सुरुवात झाली.खरीप हंगाम संपत आला शेतकऱ्यांना त्यांच्या धान पिकाला योग्य हमीभाव मिळावा या उद्देशाने आज काटापुजन करुन धान खरेदीला सुरुवात झाली.
यावेळी आदिवासी विकास महामंडळ चे संचालक अशोक मंगाम यवतमाळ, संस्था अध्यक्ष रवींद्र घरतकर, उपाध्यक्ष रघुनाथ मेश्राम, संचालक रवींद्र लोगडे,भागरथा राणे, हिराबाई वाघमारे, कांतीलाल साखरे, नारायण हटवार, तेजराम मडावी, सचिव संतोष चांदेवार, केंद्रप्रमुख रोशन राउत,रतिराम राणे, दिनदयाल डोंगरवार, पंचायत समिती सदस्या आम्रपाली डोंगरवार, सरपंच संजय ईश्वार,दिपक राणे, जयपाल कळाम, रमेश मलगाम व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.