नागझिरा अभयारण्यात टी 4 वाघिणीचे बछड्यास एकत्र दर्शन

0
30
गोंदिया : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा अभयारण्य परिसरात दिवाळीच्या सुट्यामध्ये आनंद घ्यायला आलेल्या पर्यटकांना ५ वाघांचे एकत्र दर्शन झाल्याने पर्यटक व इको गाईडमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.शुक्रवारी सकाळी टी ४ वाघीण आणि तिचे ४ प्रौढ शावक मनसोक्त फिरत असल्याचे दिसल्यानंतर पर्यटकांची संख्या नक्कीच वाढेल, अशी अपेक्षा आहे. आठवडाभराच्या सुट्टीनंतर शुक्रवारी पर्यटन सुरू झाले आणि सकाळी पिटेझरी ते नागझिरा संकुलाकडे जाणाऱ्या बुधा बुधीजवळ टी ४ वाघीण आणि तिची ४ पिल्ले आढळून आली. गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार आणि गोरेगाव येथील पर्यटकांनी याचा व्हिडिओ बनवित सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर वाघांच्या दर्शनाचा परिणाम सफारी बुकिंगवर दिसून आला. आणि महा इको टुरिझमची ऑनलाइन बुकिंग एका दिवसात फुल्ल झाली. चोरखमारा आणि पिटेझरी प्रवेशद्वारातून नागझिरामध्ये दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे.
नागपूर वरुन आलेल्या पर्यटक साक्षी डेकाटे यांनी सांगितले की,आम्ही पक्ष्यांच्या निरिक्षणासाठी आलो असताना एकाचवेळी टी 4 व टी 9 या वाघिणीचे बछड्यासह बघावयास मिळाल्याने आनंद झाल्याचे सांगितले.
पिटेझरी गेट येथील वनरक्षक डिलेश्वरी वाढई यांनी टी 4 वाघिण आपल्या बछड्यासह मुक्तसंचार करीत असल्याचे व्हिडीओ प्रसारीत झाल्यानंतर नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र दर्शनाकरीता बुकींगला उत्तम प्रतिसाद दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिल्यांदाच दिल्याचे सांगितले. पर्यटकांनी  वाघिणीचे बछड्यासह दर्शनानंतर नागझिराप्रेमी पर्यटक व्याघ्र दर्शनासाठी आतूर झाले असून जिप्सी चालक व मार्गदर्शकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.