वर्धा,दि.18 नोव्हेंबरः– आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर,होते रणधीर स्मरू त्यास.
बळीस्थानी आले शुर भैरोबा,खंडोबा,ज्योतिबा,महासुभा.सद् गुणी पुतळा राजा मुळ बळी,
दशहरा,दिवाळी अठविती.
क्षत्रिय भार्या इडा पीडा टळो,बळीचे राज्य येवो का बा?
आर्य भट्ट आले,सुवर्ण लुटिले,क्षत्री दास केले बापमत्ता.
वामन का घाली बळी रसातळी?
प्रश्न ज्योती माळी करी भटा.
याच धर्तीवर वर्धा येथे बळीराजा महोत्सव 14 नोव्हेबंरला साजरा करण्यात आला.या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी मनोज चांदूरकर होते.महोत्सवाला मार्गदर्शक म्हणून सत्यशोधक समाजाचे विचारक बाबा बिडकर आणि अनुज हुलके नागपूर हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अशोक चोपडे ,नरेंद्र पहाडे उपस्थि होते.या महोत्सवाची सुरुवात बळीराजाच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली.
या महोत्सवाचे प्रास्ताविक डॉ.अशोक चोपडे यांनी केले,तर संचालन प्रा.संगीता बढे यांनी केले.बहुजनांचा सांस्कृतिक वारसा चालवणाऱ्या अनेक प्रतिकापैकी एक प्रतीक म्हणजे सर्व सामान्यांच्या मनात रुजलेला बळी राजा.या बळी
बलिप्रतिपदा च्या पावन पर्वावर या दानविर महामानवाचे इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो अशा पद्धतीने अनेक श्रमिक,कष्टकरी,आया,बहिणी आजही करताना दिसतात.या बळीराजाला दान मागितलेल्या तीन पावलांचे प्रतीकात्मक स्वरूप बाबा बिडकर यांनी विशद केले.
सिंधू संस्कृती आणि आर्य भट्टांचे आगमन याचा वर्तमान परिस्थितीवर होत असलेला परिणाम यावर प्रकाश टाकला.
बळी राजाचे स्मरणार्थ आज वर्धा येथे यशस्वी झालेला हा बळी राजा महोत्सव हा मा. प्रॅफुल गुल्हाने, सौ. गुल्हाने व संपूर्ण मित्र परिवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. या महोत्सवाचा शेवट हा ज्योतिबा फुलेंच्या अखंड वाचनाने झाला.
या महोत्सवाची सांगता दिवाळीच्या फराळाने झाली.
या महोत्सवात प्रा.जनार्दन देवतळे,कपिल थुटे,नंदकुमार वानखेडे,गजेंद्र सरकार, मीराताई इंगोले,द्वारका इडमवार,अर्चना इंगोले,मनोहर डांगे,विजय भुजाडे,अरुण येवले,सुधीर गवळी, ॲड भास्कर नेवारे,गजानन सोरते, पारस बुरांडे, दत्तनंद इंगोले,गजानन सोरते, पारस बुरांडे, धम्मपाल ताकसांडे,मिलींद जुनघरे,संजय भगत, सुनील ढाले, विलास भगत, नगराळे सर आदींची उपस्थिती होती.