मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली विविध विषयांवर चर्चा

0
16

सिंचन, धानाचे बोनस, धान खरेदी व विकास कामाबाबद खा. प्रफुल पटेल यांचे पत्र देऊन शिष्टमंडळाने दिले निवेदन

गोंदिया/भंडारा : शासन आपल्या दारी या उपक्रमानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे आज भंडारा येथे आले होते. दरम्यान शहापूर येथील मैदानात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी तिन्ही मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने गोंदिया, भंडारासह विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचे बोनस जाहीर करावे, दोन्ही जिल्ह्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची सूचना करावी, गोंदिया- भंडारा जिल्ह्यातील रखडलेली विकास कामांना मजुरी प्रदान करून अधिक गतिमान करावे आदी विषयावर खा. प्रफुल पटेल यांचे पत्र देऊन चर्चा केली. यावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाले. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासोबत माजी मंत्री नाना पंचबुद्धे, आमदार राजुभाऊ कारेमोरे, सुनील फुंडे, भंडारा जिल्हा राईस मिल असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय दलाल, माजी खा. मधुकरराव कुकडे तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जनप्रतिनिधी , पदाधिकारी आदी उपस्थित होते.