गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरु करा,मुख्यमंत्र्यांना खा.पटेलांचे निवेदन

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्र्यांशी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी निवेदनासह केली चर्चा

गोंदिया,दि.20 ः गोंदिया येथे मंजूर झालेल्या व गेल्या सहा वर्षापासून सुुरु असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अद्यापही सुरु झालेले नसून ते त्वरीत सुरु करण्यात यावे.सोबतच गोंदिया येथे सुध्दा शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे यासबंधीचे खासदार प्रफुल पटले यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज भंडारा येथे शासन आपल्या दारी या उपक्रमानिमित्ताने आले असता माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिले.याप्रसंगी मुख्यमंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चा करताना गोंदिया जिल्ह्यात शासन आपल्या द्वारी हा उपक्रम घेण्यात यावे.गोंदिया व भंडारा जिल्हयातील धान पिकाला पेरवा या रोगाने ग्रासल्याने धानाची उत्पादन क्षमता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करणे, धानाला बोनस देणे, प्रलंबित सिंचनाच्या समस्या मार्गी लावण्यात याव्यात यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर माजी आमदार राजेंद्र जैन यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली.