आमगाव येथे उपविभागीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वीत

0
14

गोंदिया, दि.28 : पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा गोंदिया यांचे अधिनस्त नविन उपविभागीय प्रयोगशाळा आमगाव येथे 23 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यान्वीत झाली असून सदर प्रयोगशाळेत ग्रामीण भागातील जलसुरक्षकांमार्फत पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा करुन प्रयोगशाळेत रासायनिक व जैविक तपासणी करुन जनतेला शुध्द पाणी पिण्याचे धोरण राबविण्यात येत आहे.

        सदर प्रयोगशाळेचा शुभारंभ डॉ.चंद्रकांत भोयर, प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा नागपूर विभाग, नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले असून प्रमुख अतिथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आनंद पिंगळे जि.प.गोंदिया, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.शिवाजी पद्मने भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा नागपूर विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

        यावेळी कुणाल इंगळे वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा गोंदिया, गणेश ठाकुर वरिष्ठ रसायनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा नागपूर, आशिष ब्राम्हणकर कनिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा गोंदिया, मुकेश त्रिपाठी जि.प.गोंदिया, प्रदिप शरणागत जिल्हा सनियंत्रण कक्ष गोंदिया, दिनेश वाघमारे उपविभागीय प्रयोगशाळा आमगाव, दिपेन्द्र भावे उपविभागीय प्रयोगशाळा आमगाव, भारती पटले जि.प.गोंदिया, राहुल राठोड उपविभागीय प्रयोगशाळा गोरेगाव व सोनु राऊत न.प.आमगाव उपस्थित होते