चिचगड- चिचगड येथे आज 29 तारखेला धान खरेदी केंद्राचे उद्घाटन भरतभाऊ दुधनाग संचालक आदिवासी महामंडळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आदिवासी सोसायटीचे अध्यक्ष संतराम भोयर,उपाध्यक्ष भुवनजी नरवरे,अशोक झिंगरे,सावंत राऊत,जिल्हा परिषद सदस्य राधिकाताई धरमगुडे,ग्रामपंचायत सरपंच भाग्यश्रीताई भोयर,द्वारका धरमगुडे, सचिव सदाराम मडावी,जगदीश नरवरे पोलीस पाटील आणि चिचगड आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी क ग्रेड धानाची किंमत 2183 आणि ए. ग्रेड 2243 असे किंमत असल्याचे जाहिर करण्यात आले.