सरकारला चुना लावणाऱ्या ईगल इन्फ्राच्या मालकाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते सन्मान

0
6

अकोला :-राष्ट्रीय महामार्ग ६ वर बडनेरा ते कुरूम या दरम्यान रस्त्याचा बीटूमस कॉंक्रीटीकरन करून विश्वविक्रम करणाऱ्या राजपथ कंपनीच्या सहयोगी कंपनी इगल इन्फ्रा कंपनीला अतिरिक्त मुरूम उत्खनन केल्या प्रकरणी ३ कोटी पेक्षा दंड देण्यात आला होता.तर या प्रकरणाची आमदार पिंपळे यांनी तक्रार केली होती. सोबतच रिधोरा जवळ सुरू असलेल्या या कंपनीच्या डांबर प्लांट मध्ये बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. तर याच कंपनीच्या मालकाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मूर्तिजापूरच्या कार्यक्रमात सन्मानही करण्यात आल्याने विविध चर्चेला उधान आले आहे.

काय प्रकरण आहे

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी मागील आठवड्यात विश्वविक्रमी रस्त्याचे व तसेच विविध कामाचे भूमिपूजन करण्यासाठी मूर्तिजापूर येथे आले होते. या कार्यक्रमात विश्वविक्रम करणाऱ्या राजपथ कंपनीचे कर्मचारी तसेच त्यांच्या सहयोगी कंपनी ईगल इन्फ्राच्या मालकाचा सत्कार कण्यात आला होता. हे तेच कंपनी होय जिच्यावर मुरूम चोरीचा आरोप आमदार हरीश पिंपळे यांनी केला होता. वडगाव आणि निपाणा या दोन्ही गावाच्या शेतशिवारातून क्षमतेपेक्षा जास्त हजारो ब्रास मुरुमाची चोरी केली होती, याप्रकरणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी ३३ कोटींचा दंड ही दिला होता तर ३३ कोटी रुपयांचा दंड फक्त ३ कोटीवर आणला कसा? यातील किती भरला हे न समजलेले कोड आहे. सोबतच अकोला ते खामगाव राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रिधोरा जवळ सुरू असलेल्या ईगल कंपनीच्या डांबर प्लांट मध्ये बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी बॉयलर स्फोटात कामगार मृत्यू प्रकरणी ८ दिवसात आरोपींना अटक अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी स्वर्गीय आमदार विनायकराव मेटे यांनी केली होती.त्यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. यामध्ये मृत्यू झोलेल्या दोन्ही कामगारांच्या कुटुंबियांना वाढीव मदत ५ लाखापासून १० लाख करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आलं. यातील दोन मजुरांच्या परिवाराला किती रक्कम भेटली? गडकरी साहेबांना कदाचित हे प्रकरण माहिती नसेल परंतु ईगल कंपनीवर असलेला सरकारचा ३३ कोटीचा दंड माहिती असेल. जिल्हाधिकारी यांनी सुनावलेला दंड कश्याप्रकारे कमी होतो हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. या प्रकरणामध्ये कोणाचे हात ओले झाले.हे माहितीच्या आधारात समजून येईलच.

अनेक प्रकारच्या भानगडीत सापडलेल्या अशा कंपनीचा सत्कार केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होणं म्हणजे ‘ सुबह का भुला शाम को घर वापस आया तो उसे भुला नही कहते ‘ सारखाच प्रकार असल्याची चर्चा आहे.