अर्जुनी मोर. ) प्रत्येकांचे घरात पुस्तकांचे कपाट असले पाहिजे. “वाचाल तर वाचाल “ही धोरणे अवलंबली पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्रशांत करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” हा मंत्र दिला. आपण पहिलीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतो तो पदव्या व नोकरी मिळविण्यासाठी मात्र अवांतर व इतर पुस्तकाचे वाचन केल्यास आपणाला समाजात कसे वावरायचे, आपला सामाजिक आर्थिक व कौटुंबिक विकास कसा करायचा हे सामान्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी व जनरल ज्ञान प्राप्तीसाठी वाचन संस्कृती काळाची गरज असून त्यामुळे प्रत्येकांचा बौद्धिक विकास होतो असे आवाहन डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी केले.
अर्जुनी मोर तालुक्यातील बोरटोला /इंजोरी या गट ग्रामपंचायतीला डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांचे कडून स्पर्धा परीक्षेची पुस्तके संच ( ता 1) ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य व गोंदिया जिल्हा परिषद गटनेते लायकराम भेंडारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती राजेश नंदागवळी ,सरपंच कुरुंदा वैद्य, चुनीलाल येरणे, ग्रामपंचायत सदस्य प्रेमलाल नारनवरे तसेच गावातील बहुसंख्य युवक व नागरिक उपस्थित होते.