भंगी ऐवजी रुखी किंवा वाल्मिकी शब्दाचा वापर करण्याच्या सूचना

0
23
वाशिम दि.०४- अनुसूचित जातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक १२ वर ” भंगी ” या जातीचा समावेश आहे.त्या जातीची तत्सम जात म्हणून ” रुखी ” किंवा ” वाल्मिकी ” या जातीचा समावेश आहे.”भंगी” हा सफाई कामाकरिता असलेल्या रुखी जातीच्या लोकांसाठी घृणास्पद व अपमानजनक बहिष्कृत अशा अर्थाने व्यवहारात प्रचलित झालेला जातीदर्शक शब्द असून त्याचा शासन व्यवहारातील उपयोग हा या समाजाची अवहेलना करणारा ठरतो. म्हणून शासन व्यवहारातून भंगी या शब्दाचा वापर स्थगित करून त्याऐवजी रुखी किंवा वाल्मिकी या शब्दाचा वापर शासन व्यवहारात करण्याबाबत शासनाने यापूर्वीच परिपत्रक काढले आहे.शासनाची सर्व कार्यालय,महानगरपालिका, नगरपालिका,स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा,महाविद्यालये,महामंडळे व इतर सर्व शासकीय /निमशासकीय कार्यालयांनी त्या परिपत्रकाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सुचना समाजकल्याण आयुक्त पुणे यांनी दिल्या आहेत.