
गोंदिया : रेशन धान्य दुकानदारांच्या मागण्या अजून सुटलेल्या नाहीत. पूर्वीपेक्षा कामामध्ये वाढ झाली असताना दुकानदारांच्या गल्ल्यात एक रुपयाही रोखीने पडत नसल्याने रेशन दुकानदारांना दिवसाचा खर्च भागवणेही कठीण झाले. अशा परिस्थितीत राज्य सरकारने वेळेत उपाययोजना कराव्यात अशा आदी मागण्यांसाठी १ जानेवारीपासून बेमुदत आणि १६ जानेवारीपासून दिल्ली येथे धरणा प्रदर्शन करण्यात येणार आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी २७ डिसेंबरला स्थानिक विश्राम गृह येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना काळापासून रेशन दुकानदारांच्या कामाचे स्वरूप वाढवताना रेशन दुकानदारांच्या उत्पन्नात काहीही बदल झालेला नाही, उलट वाढत्या महागाईनुसार तोटाच होत आहे. रेशन दुकानदारांच्या समस्या सोडवण्यात सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या समस्या वेळेत सोडवल्या न गेल्यास दुकाने बंद करावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने १ जानेवारीपासून बेमुदत आणि १६ जानेवारीपासून दिल्ली येथे धरणा आंदोलन करण्यात येणार आहे. अशा आदी समस्यांवर चर्चा करण्यासंदर्भात विश्राम गृह येथे रेशन दुकानदारांची २७ डिसेंबरला सभेचे आयोजन करण्यात आले. तेव्हा जिल्ह्यातील समस्त रेशन दुकानदारांनी सभेत उपस्थित रहावे, असे आवाहन रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा सचिव बबलु वासनिक यांनी केले आहे