अल्टिमेट खो खो सिझन ०२ मध्ये दिलराजसिंग सेंगर राजस्थान वॉरियर्स कडून खेळणार

0
5
पवनी येथे १७ वर्षाखालील मुलांना दिलराजसिंग मोफत देतात खो खो चे प्रशिक्षण
पवनी : संपूर्ण भारतात सद्या अल्टिमेट खो खो ची चर्चा सुरू असून नागरिक अल्टिमेट खो खो सीझन ०२ बघण्यास उत्सुक्त आहेत ही अल्टिमेट खो खो २४ डिसेंबर २०२३ ते १३ जानेवारी २०२४ ला जवहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियम, कटक, ओडिशा येथे होणार असून हि टिव्ही वर सोनी स्पोर्ट्स या चॅनल वर दिसणार आहे व संपूर्ण देश बघणार आहे अल्टिमेट खो खो ही देशात दुसऱ्यांदा होत असून प्रो कब्बडी समान सोनी टीव्ही वर दिसणार आहे यामध्ये ६ संघ सहभागी होणार आहेत त्यामध्ये राजस्थान वॉरियर्स, चेन्नई क्विक गनस, गुजरात जियांट्स, मुंबई खिलाडीस, तुलगु योद्धास्, ओडिशा जुग्गेरन्टस दिशा ही ६ संघ खेळणार आहेत. यामध्ये खेळणारे खेळाडूंची निवड ही मागील ३-५ वर्षातील राष्ट्रीयस्तरावरील तसेच मागील वर्षी अल्टिमेट खो खो खेडलेले २७२ खेळाडूंचे नामांकन मधून १४५ तर १६ ते १८ वयोगटातील २१ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या १६६ खेळाडूंची ६ संघामध्ये निवड करण्यात आली आहे व लवकरच आपल्याला ही अल्टिमेट खो खो सोनी स्पोर्ट्स टीव्ही वर दिसणार आहे.
 या अल्टिमेट खो खो मद्ये दिलराजसिंग रेखा सेंगर मुळ राहणार काटोल येथील असून हे आता वनविभाग पवनी येथे ०१ सप्टेंबर २०२१ पासून कार्यरत आहेत यांची अल्टिमेट खो खो मधील राजस्थान वॉरियर्स या संघामध्ये कॅटेगरी ए टॉप त्री मध्ये रिटेन करण्यात आले आहे. दिलराजसिंग हे विदर्भ क्रीडा मंडळ, काटोल येथे प्रशिक्षण घेतला असून आता हे मागील डिसेंबर २०२१ पासून पवनी येथे १७ वर्षाखालील मुलांना खो खो चे प्रशिक्षण देत असतात. दिलराजसिंग यांना लहानपणाासून खो खो ची आवड असून हे २०१५ -१६ पासून वरिष्ठ प्रवर्गामध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत यामध्ये २०१५ – १६ मध्ये साऊथ एशियन चॅम्पियनशिप २०१६ गोवाहटी येथे झाली यामध्ये त्यांचं टीम इंडिया मध्ये सहभागी झाले त्यानंतर आशियन चॅम्पियनशिप २०१६ मध्ये इंदोर येथे झाली यामध्ये सुध्दा त्यांची टीम इंडिया सहभागी झाले. त्यानंतर एस. जी. टी. युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप २०२० ला निवड झाली व यानंतर राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर दिल्ली येथे लिग घेण्यात आली त्यामध्ये पहाडी बिल्ला या संघामध्ये निवड झाली होती व त्यांनी त्या लीग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता त्यानंतर २०२२ ला राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर दिल्ली येथे घेण्यात आला. मागील वर्षी ऑगस्ट २०२२ मध्ये अल्टिमेट खो खो मध्ये राजस्थान वॉरियर्स कळून खेळले होते तसेच ३६ वी नॅशनल गेम्स गुजरात ला २०२२ मध्ये महाराष्ट्र चा संघाकडून महाराष्ट्र करीता गोल्ड मेडल देखील यांनी आणला होता तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२१-२२ उपमुखमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपुर जिल्हा मा. ना. देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते दिलराजसिंग यांना ०१ मे २०२३ रोजी देण्यात आला होता.
 संपूर्ण विदर्भातून दिलराजसिंग सेंगर यांचा कौतुक होत आहे व संपूर्ण पवनी मध्ये यांचा कौतुक होत आहे.
 दिलराजसिंग सेंगर यांनी पवनी मध्ये मोफत खो खो चे प्रशिक्षण देत यांनी मागील २०२२ मध्ये सब ज्युनिअर नॅशनल गेम्स, सातारा येथे विदर्भ सांघा मध्ये पवनीचा परिमल सदानंद लांजेवार हा खेळला तसेच या वर्षी सब ज्युनिअर नॅशनल गेम्स, बँगलोर येथे विदर्भ सांघा मध्ये पवनीचा तेजस दशरथ मंडपे खेळला व तसेच २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०३३ होत असलेली ज्युनिअर नॅशनल गेम्स, छत्तीसगड येथे विदर्भ सांघा मध्ये पवनी चा मिलींद उमेश तुळानकर यांची निवड झालेली आहे. शालेय क्रीडा स्पर्धेत दिलराजसिंग यांनी शिकवलेले खेळाडू चा संघ खो खो खेळात नागपुर विभाग जिंकुन राज्यस्तरावर देखील पोहचला होता.
 या सर्व गोष्टींचा श्रेय दिलराजसिंग सेंगर त्यांच्या आई रेखा सेंगर यांना आणि विदर्भ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ काटोल चे संस्थापक स्व. सुनील सोनारे सर यांना दिला आहे.
 दिलराजसिंग सेंगर यांनी पवनी येथे स्थापन केलेला नव विदर्भ क्रीडा मंडळ पवनी तसेच विदर्भ क्रीडा मंडळ काटोल यांच्या सर्व पदाधिकारी आणि खेळाडू तर्फे दिलराजसिंग सेंगर यांना शुभेच्छा आणि अभिनंदन करून त्यांचा पवनी नगरातील सर्व शासकिय तथा अशासकीय कार्यालय व तसेच पवनी नगरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना तर्फे यांचा कौतुक करीत आहेत.