शहिद आदिवासी गोवारी स्मारकाचे लोकार्पण सोहळा ३० रोजी

0
11

श्रध्दांजली व प्रबोधन मेळाव्याचे आयोजन
गोंदिया : आदिवासी गोवारी स्मारक समिती गोवर्धन चौक छोटा गोंदियाच्या वतीने शहिद ११४ आदिवासी गोवारी स्मारकाचे लोकार्पण सोहळा, श्रध्दांजली कार्यक्रम व प्रबोधन मेळावा ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता गोवर्धन चौक छोटा गोंदिया येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आ.विनोद अग्रवाल यांच्या हस्ते आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्रचे अध्यक्ष वैâलाश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला दिप प्रज्वलक म्हणून माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, रूपेश चामलाटे, नंदु शहारे, भगवान भोंडे तर प्रमुख अतिथी म्हणून घनश्याम पानतवणे, न.प.चे माजी उपाध्यक्ष शिव शर्मा, माजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, हितेंद्र बिसेन, अनिल शरणागत, कुंदाताई पंचबुध्दे, डिंपल उके, हिवराज बिसेन, विष्णु नागरीकर, बंटी बानेवार, विनोद पंधरे, रंजीत गौतम, नंदु आंबेडारे, संतोष पटले, विजय नेवारे, गोकुल बोपचे, सुरज नेवारे, सुनिल भोयर, अरूण काळसर्पे, अशोक जोशी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी शहिद स्मारकाचे लोकार्पण करून शहिद ११४ आदिवासी गोवारी बांधवांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येत समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक तथा आदिवासी गोवारी समाज संघटन गोंदियाचे शहर अध्यक्ष सुशिल राऊत, गोविंद वाघाडे, डॉ.शारदाताई राऊत, वसंत नेवारे, नानु चचाणे, सुनिल सोनवाने, संतोष शहारे, मारोती नेवारे व अक्षय नेवारे आदिंनी केले आहे.