निमगाव येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

0
6

 अर्जुनी मोरगांव,दि.01– तालुक्यातील निमगांव येथे १ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्ताने ३ जानेवारी २०२४ रोजी संगितमय समाज प्रबोधनाधनात्मक कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन नवतरुण जयभीम ग्रुप निमगांवच्या वतीने करण्यात आले आहे. नवतरुण जय भीम ग्रुप मागील वर्षी पासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडत असून यावर्षी सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री राजकुमार बडोले राहणार आहेत.तर उद्घाटक  म्हणून नगरसेवक दानेश साखरे,सहउद्घाटक जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर,बाजार समितीचे सभापती यशवंत परशुरामकर,सुगत चंद्रीकापुरे,दीपप्रज्वलन पंचायत समिती सभापती सविता कोडापे यांच्या हस्ते होणार आहे. तरी या समाज प्रबोधन कार्यक्रमाला सर्व समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.