अर्जुनी मोर.-तालुक्यातील भीम पॅथर युवा मंच धाबेटेकडी/आदर्शच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा थिएटर्स सिंदेवाही वडसा प्रस्तुत मी योद्धा भीमा कोरेगावचा या नाट्यप्रयोगाचे आयोजन मंगळवार दि. २ जानेवारी २०२४ रोजी रात्री ९:३०वाजता जि.प.शाळेतील आवारात धाबेटेकडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन सदानंद जांभुळकर यांचे हस्ते, नगरसेवक दानेश साखरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सहउद्घाटक म्हणुन प्रशासकिय अधिकारी हेमंत रामटेके, तथा अतिथी म्हणुन वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत लाडे ,जिल्हा परिषद सदस्य पौर्णिमा ढेंगे ,सभापती सविताबाई कोडापे, सरपंच संध्याताई आरसोडे, पोर्णिमाताई मेश्राम, सपनाताई शहारे, मंगलाताई जांभुळकर, करिश्माताई जांभुळकर ,अर्चना रामटेके तर सत्कार मूर्ती म्हणून कमलेश जांभुळकर, विशेष अतिथी म्हणून उपसभापती होमराज पुस्तोळे, पंचायत समिती सदस्य नूतन सोनवाणे,संदीप कापगते ,डॉ. नाजूक कुंभरे, उमाकांत ढेंगे,सुरेंद्रकुमार ठवरे, व्यंकट खोबरागडे, देवेंद्र टेंभरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.सदर नाट्यप्रयोग मोफत दाखविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भीम पॅंथर युवा मंच धाबेटेकडी आदर्शचे नोटेशकुमार सांगोळे, अनिल रामटेके, अमित जांभुळकर, स्वप्निल साखरे, रोशन जांभुळकर, प्रशांत जांभुळकर, अभिषेक रामटेके, रोहित जांबुळकर व अन्य सदस्यांनी केले आहे.