**जिप च्या स्थाई समिति मधे मुद्दा उपस्थित*
गोंदिया*– 2 जानेवारीला दुपारी 2 ला आयोजित करण्यात आलेली गोंदिया जिल्हा परिषदेची स्थायी समितिची सभा ही तब्बल पावणे दोन तास उशीरा सुुरु झाल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांना भटकंती करण्याची वेळ आली.या मुद्याला घेत जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांकरीता प्रतिक्षालयाची व्यवस्था करीत विरोधी पक्ष गटनेत्याला सर्व सुविधा देण्याचा मुद्दा मांडला.नियोजीत वेळेवर जिल्हा परिषद अध्यक्ष हजर न झाल्याने 1.40 मिनीटे उशीरा सभा झाल्याचा कटरे यांनी म्हटले आहे. देशात पंचायत राज लागु करण्याकरिता 73 वी घटना दुरुस्ती झालेली आहे.जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालयाचा दर्जा असुन स्थानिक स्वराज्य संस्थाथांचे केंद्र बिंदु आहे.आणि विकासचे विकेंद्रीकरण व्हावे म्हणून जिला परिषद विरोधी पक्ष गटनेत्याला विधानसभेप्रमाणे शासकिय अधिकार वाढऊन स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करुन देण्याचा ठराव स्थायी समितीत घेऊन जिपच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून शासनास पाठवावे अशी मागणी केली.तसेच ओबीसी गटातील लोकांना मंजूर झालेल्या घरकुलाचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना कधीपर्यंत मिळणार,ढिवरटोली ते सिलेगाव रस्ता कामाची चौकशी करण्याचा मुद्दाही यावेळी सभेत कटरे यांनी उपस्थित केला.
जिल्हा परिषद गेट नेते संदीप भाटिया यांनी नुकतेच झालेल्या अटल क्रीडा महोत्सवात जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षांच्या सदस्याना विश्वासात न घेता कार्यक्रम करण्यात येऊन क्रीड़ा महोत्सवाच्या कार्यक्रमाला एका पक्षाचे स्वरूप देण्यात आल्याचे सांगत जिल्हा परिषद निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप केला.जिल्हा परिषद सदस्य माधुरी कुंभरे यांनी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये भूमिपूजनाचे कार्यक्रमात आमंत्रित करण्यात येत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.