गोंदिया,दि.03– शहरातील एम जी पैरामेडिकल कॉलेज चन्द्रशेखर वार्ड येथे आज सावित्रीबाई फुले जयंती दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्रीमती उमा गजभिये अध्यक्ष सावित्रीबाई फुले महिला संघटन, गोंदिया यानी सांगितले की अतिशय बिकट परिस्थितीत ही न डगमगता आपले शिक्षण पूर्ण करून पूण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा खोलून संपूर्ण नारीशक्तीला शिक्षणांचे द्वार खुले केले. सर्व विद्यार्थिनां तिचा हा वारसा पुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी असल्याचे सांगिितले.
प्रमुख अतिंथी श्रीमती प्रियंका गोंडाने यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याविषयी माहिती दिली. फक्त जयंती साजरी करण्याला महत्व न देता समाजातिल महिलांच्या शोषणांच्या विरोधात काम करून समाजातिल महिलांचे स्थान बळकट करू हेच सावित्रीबाईला खरे अभिवादन ठरेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी एम जी पैरामेडिकल कॉलेज चे संचालक अनिल गोंडाने, प्रियंका गोंडाने व सर्व शिक्षकवृंद प्राचार्या अनुसया लिल्हारे, प्रा. प्रीती वैद्य, प्रा. ललीतकुमार डबले, प्रा. रामेष्वरी पटले, प्रा. छाया राणा, प्रा. आरती चौधरी, प्रा. मनीष चौधरी,राजु रहांगडाले,सौरभ बघेले, राजाभाऊ उंदीरवाडे,योगेष्वरी ठवरे व रूपाबाई धमगाये प्रामुख्याने उपस्थित होते.