
गोंदिया,-आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गोंदिया तालुक्याची सभा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र कटरे यांचे अध्यक्षतेत व राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर यांचे प्रमुख उपस्थितीत आयटक कार्यालयात संपन्न झाली. सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयटकच्या जिल्हा सहसचिव करुणा गणवीर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करून त्यांनी स्त्री शिक्षणा साठी केलेल्या कार्याची, महिला सामानते साठी केलेल्या कार्यावर विचार व्यक्त केले. तसेच मोहन डोंगरे यांनी सावित्रीबाई व महात्मा जोतिबा फुले यांच्या विविध कार्याची आठवण करून दिली. या सभेत कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी, मागण्यान्वर चर्चा करण्यात आली या सभेचे संचालन विनोद शहारे यांनी केले व उपस्थिततांचे आभार राधेश्याम उके यांनी मानले. सभेत प्रामुख्याने भाऊलाल कटंगगकार, रवी जमरे, प्रमोद काटेकर राधेश्याम उके, विठ्ठल उके, देवेंद्र क्षीरसागर, भोजराज गुप्ता, सुरेश पंधरे, मनोज राऊत, सुजित खोब्रागडे, महेश बिसेन, संदीप चौधरी, शिवराम दमाहे, दुर्गेश न्यायकरे, राजू राऊत, वालदीप फरकुंडे, जयपाल गिऱ्हेपुंजे, टेकचंद तवाडे प्रदीप तवाडे, इत्यादी कर्मचारी हजर होते.