गोंदिया,दि. 4 जानेवारी – सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला (हेटी) येथे दरवर्षी मामा-भाचा देवस्थान समितीच्या वतीने १ व २ जानेवारीला मामा भाचा यात्रेचे आयोजन करण्यात येते. ह्या वर्षी सुद्धा भव्यदिव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.मामा-भाचा यात्रा गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या सिमेवर भरते. या यात्रेत गोंदिया, भंडाला या दोन्ही जिल्ह्यातील भाविक मामा-भाचाच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात येतात. विशेष म्हणजे, तालुक्यातील मामा-भाचा देवस्थान गिरोला गावापासून एक किलोमीटर अंतरावर व दोन गावांच्या मध्यभागी निसर्गरम्य वातावरणात भरते.प्राथमिक आरोग्य केंद्र पांढरी अंतर्गत गिरोला उपकेंद्रात असल्याने आरोग्याच्या चांगल्या सुविधा प्रदान केल्या जातात. यात्रेची सुरवात दि. 1 जानेवारीला अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. मनोहरजी चंद्रिकापुरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यात्रेच्या दोन्ही दिवशी आरोग्यवर्धिनी गिरोला उपकेंद्रामार्फत आरोग्य प्रदर्शनी व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेप्रसंगी किरकोळ आजाराच्या रुग्णांना प्रथमोपचार करण्यात आले तर आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारे राष्ट्रिय आरोग्य कार्यक्रम, विविध योजनंची प्रचार व प्रसिद्धि आरोग्य कर्मचार्यामार्फत करण्यात आली.
दि.1 जानेवारीला आमदार मा.मनोहरजी चंद्रिकापुरे यांनी भेट देवुन आरोग्य कार्यक्रम व योजनांची माहिती जाणुन घेतली.त्याप्रसंगी सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. कल्याणी राऊत, आरोग्य सहाय्यक ठाकरे, आरोग्य सेविका भोवते, आशा सेविका वर्षा पंचभाई, अंशकालीन स्त्री परिचर प्रतिमा तागडे यांनी आरोग्य सेवा व जनजागृती केली.