सहाय्यक संचालक नागपुर डॉ.गवई यांची आरोग्यसंस्थाना आकस्मिक भेटी

0
18

गोंदिया(दि.04जानेवारी)- तालुक्यातील आरोग्य संस्था आकस्मिक भेट देवुन आरोग्य संस्थेव्दारे देण्यात येणार्या आरोग्य सेवेची प्रत्यक्ष पाहणी 03 जानेवारी रोजी उपसंचालक कार्यालय नागपुर मंड्ळ सहाय्यक संचालक डॉ.गवई यांनी केली.
सर्वात प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र कामठा येथे भेट देवुन कामकाजाची पाहणी केली.त त्यांनी औषधी भांडार, लसीकरण कक्ष, शितसाखळी गृह व त्यातील उपकरण, प्रसुती गृह , शल्यचिकीत्सा गृह , वॉर्ड चे निरीक्षण करुन आवश्यक सुचना दिल्या. भेटी दरम्यान पांजरा येथील लसीकरण सत्राचे निरिक्षण केले. व लाभार्थी सोबत देण्यात येणार्या आरोग्य सुविधाबाबत अभिप्राय जाणुन घेतल्या. गरोदर मातेचे माता व बाल संरक्षक कार्डची पाहणी केली. तसेच ग्रामपंचायत पांजरा ला भेट देवुन ब्लिचिंग साठा व लाल, हिरवे व पिवळे कार्ड बाबत माहिती जाणुन घेतली. साथरोग बाबत आवश्यक प्रतिबंधात्मक सुचना प्रदान केल्या.
ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे भेट देवुन रुग्णालय मध्ये काम वाढ्वुन लोकांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने काम वाढविण्याच्या सुचना दिल्या.भेटी दरम्यान त्यांचे सोबत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे उपस्थित होते.भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र कामठा चे वैद्यकीय अधिकारी डॉ.अंकुश मेश्राम व ग्रामीण रुग्णालय रजेगावचे वैद्यकीय अधिक्षक यांच्याशी हितगुज करुन समस्या जाणुन घेतल्या. भेटि दरम्यान दोन्ही आरोग्य संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.