आर्थिक व डिजिटल साक्षरता जागृती कार्यक्रम व विकसीत भारत संकल्प यात्रा

0
21

आमगाव,दि.08- आमगाव तालुक्यातील जिल्हा परीषद शाळा सितेपार येथील पटागंणावर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड अंतर्गत गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदियाच्या वतीने आर्थिक व डिजिटल साक्षरता जागृती कार्यक्रम व विकसीत भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला नाबार्डचे अविनाश लाड,श्री.गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदियाचे सचिव विजय बहेकार उपस्थित होते.
सर्व महिला बचत गट पदाधिकारी, सदस्य, शितेपर सहकारी सोसायटी अध्यक्ष, सदस्य ,ग्रामसेवक, बचत गट आईसीआरपी,कृषि सखी,पशु सखी,ग्रामपंचायत उपसरपंच,सदस्य ,शेतकरी , ग्रामस्थ ,आरोग्य विभाग कर्मचारी,विद्यार्थी शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रथम क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यात ऑनलाईन माध्यमातून घर केसीसी अभियान,विमा योजना,लघु उद्योग, क्रॉप लोन,पीएम किसान योजना,जीवन ज्योति योजना आणि इतर विविध शासकीय योजने बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.