गोंदिया,दि.12ः जिल्ह्यातील लोककलावंताना एका छत्रछायेखाली एकत्रित आणण्याच्या हेतून आॅल इंडिया लोकला सेवा मंंडळाच्यावतीने गोंदिया जिल्ह्यात लोककला सेवा मंडळाची कार्यकारिणी गठित करण्याकरीता येत्या 14 जानेवारी रोज रविवारला दुपारी 12 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे.ही सभा गोंदिया जिल्हा लोककला सेवा मंडळाचे अध्यक्ष संजय कटरे यांच्या अध्यक्षतेखाली एकोडी येथील संजू पारधी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे.सभेमध्ये नवीन पदाधिकारी व सदस्यांची नियुक्ती करणे,तळागळातील कलावंतांना मंच उपलब्ध करून त्यांना मिळणाऱ्या लाभांची माहिती उपलब्ध करुन देण्यावर चर्चा करण्यात येणार आहे.तसेच येत्या काळात जिल्ह्यात लोककलावंत मेळावा आयोजनावर चर्चा होणार असल्याने गोंदिया जिल्ह्यातील लोककलावंतीनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लोककला सेवा मंडळ (ऑल इंडिया ) गोंदिया जिल्हा अध्यक्ष संजय कटरे यांनी केले आहे.