ककोडी येथे भक्तिमय वातावरणात रक्तदान

0
9

विनोद सुरसावंत/ककोडी- दि.१४- देवरी ताालुक्यातील ककोडी येथे सतत ११ वर्षापासुन चालत आलेल्या परंपरेला कायम ठेवत येथील श्री बजरंग मानस महोत्सव मंचच्या वतीने तिन दिवसीय ( रामायण) मानस महोत्सव कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले.सोबतच भक्तिमय वातावरणात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
तिन दिवसीय मानस टिका (रामायण) सोबत रक्तदान, आयुष्यमान कार्ड, उज्वला योजनेचा K Y C., तसेच दंन्त आरोग्य शिबिराचे आयोजन घेण्यात आले.या शिबिराच्या माध्यमातून गावकरी तसेच ककोडी क्षेत्रातील नागरिकांना ऐकाच मचांवर विविध जनकल्याण योजनेचा फायदा मिळाला.महत्त्वाचे म्हणजे मानस महोत्सवाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यानी रक्तदान केले.