बोंडगावदेवी येथील पटाला हजारो शौकिनांची गर्दी

0
10

=जगत रहांगडाले यांचे जोडींनी पटकावले प्रथम द्वितीय क्रमांकाचे बक्षीस
अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे )-तालुक्यातील तिर्थक्षेत्र बोंडगाव देवी येथे १३,१४ जानेवारीला भव्य ईनामी बैलाच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते.या पटामधे हजारो पट शौकिनांनी एकच गर्दी केली होती. या पटामधे मोके/किन्हीचे पट शौकीन जगत रहांगडाले यांचे जोडींनी प्रथम २३ हजार रुपये व द्वितीय १७ हजाराचे बक्षीस पटकावीले आहे.
तालुक्यातील बोंडगाव देवी येथे मागील वर्षी पासुन सार्वजनिक पट समिती व नाट्य मंडळ तथा समस्त ग्रामवासिंयातर्फे दोन दिवसीय बैलाचे पटाचे आयोजन करण्यात येते.यावर्षी १३,१४ जानेवारी ला पटाचे आयोजन करण्यात आले. या पटामधे विविध गावातील ११० बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. यामधे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जगत रहांगडाले यांचे जोडींनी पटकावले,तर तिस-या क्रमांकाचे बक्षीस खंडाळा येथील पांडुरंग बाळबुध्दे यांचे जोडीने, चवथ्या क्रमांकाचे बक्षीस खांबा जांभळी चे शेरा सिखंदर राणे यांच्या जोडीने तर पाचवा क्रमांक चिंगी येथील निखील कापगते यांचे जोडीने पटकावीले. तर प्रथम क्रमांकाचे हरणारी गोरा शेरा मुरमाळी या जोडीला पाच हजाराचे बक्षीस देण्यात आले. या पटामधे प्रथम क्रमांकापासुन तर १५ व्या क्रमांकापर्यंत बक्षिसे देण्यात आली.
पटात विजयी ठरलेल्या बैलजोडी मालकांना जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर, डाॅ. भारत लाडे, दे.मो.मानकर, रत्नाकर बोरकर, गजानन बोरकर, नरेंद्र बनपुरकर, राधेश्याम झोळे, महादेव बोरकर, मोहन झोळे, राजेश झोळे यांचे हस्ते बक्षिसे देण्यात आली. पटाचे यशस्वी आयोजनासाठी रवी बनपुरकर, नाजूक झोडे, राजेश झोळे, ज्ञानेश्वर मेश्राम, रामदास शहारे, एडवोकेट श्रीकांत बनपूरकर व मंडळाच्या अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले.