आदिवासी गोंड समाज सामूहिक विवाह सोहळा पूर्वतयारी सभा उत्साहात

0
7

गोंदिया,दि.15 : गोंडवाना मित्र मंडळ गोंदियाच्या वतीने रेस्ट हाऊस गोंदिया येथे 13 जानेवारी 2024 जिल्हा स्तरावर आदिवासीं गोंड समाज सामुहिक विवाह सोहळा आयोजन करण्याकरीता सभा घेण्यात आली.
सभेत आदिवासी गोंड समाज सामुहिक विवाह सोहळा साजरा करण्याकरिता विविध विषयवार चर्चा व जिल्हा स्तरावर आदिवासी सामुहिक विवाह सोहळा गोंदिया येथे मे 2024 ला आयोजीत करण्यात येणार आहे.
घनश्याम तोडसाम कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेत प्रमुख मार्गदर्शक नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन केंद्रीय सचिव  दुर्गाप्रसाद कोकुडे, पीपल फेडरेशन जिल्हा अध्यक्ष करण टेकाम, सचिव नीलकंठ चिचाम , महिला उपाध्यक्ष संगीता पुसाम, चत्रुघन मरकोल्हे , प्रमिला सिंद्रामे, एड विवेक धुर्वे, जगदीश मडावी ,धनलाल उईके, पी बी टेकाम, दिनेश मडावी, अनिल वट्टी , एल एस कुंभरे, भरत टेकाम यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.पुढील आढावा बैठक 28 जानेवारी 2024 रविवारला रेस्ट हाऊस गोंदिया येथे घेण्याचे ठरविण्यात आले.सभेत जिल्हातील विविध आदिवासी गोंड समाज कर्मचारी , पीपल फेडरेशन , महीला फेडरेशन , गोंडवाना मित्र मंडळ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .