चिल्हाटी येथे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण

0
19

 उमेद महिला मेळाव्याचे आयोजन   

   देवरी, दि.१५: तालुक्यातील चिल्हाटी येथे गेल्या बुधवारी दिशा सहाय्यता समूह (बचत गट) यांचे वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण व उमेद महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण व महिला मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य उषा शहरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चिल्हाटीच्या सरपंच पुस्तकला मरई, उपसरपंच रामजी हिरवाणी व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच पोलिस पाटील गुमान कुवरदादरा, गाव पाटील देवानंद सेवता, अंगणवाडी सेविका पंचवती कौशल, पार्वती सोनढाण, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मुनिंद्र कौशल, उन्नती महिला ग्राम संघ अध्यक्ष तोमिन कारत कुवरदादरा, उमेद कार्यकर्ता दुलेश्वरी कोमल रणढाफडा, राजकुमारी टेंभुरकरर, अनिता सेवता,प्रीती शिरभटये, हिरमत कुवरदादरा यांच्यासह उन्नती महिला ग्राम संघाचे सर्व महिला सदस्य व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते