श्रीक्षेत्र काशीघाट येथे प्राथमिक आरोग्य केन्द्र सुकडी/डाक ची आरोग्य सेवा शिबीर

0
6

तिरोडाP तालुक्यात संक्रातीच्या पर्वावर चुरडी येथील श्रीक्षेत्र काशीघाट येथे भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. गोंदिया ,गोरेगाव व तिरोडा तालुक्यातील लाखो यात्री संक्रांतीच्या पर्वावर भाविक एकत्र येवुन आस्था प्रतित करतात.ह्या वर्षी देवस्थान समिती मार्फत दिनांक 13 ते 18 जानेवारी एकुण सहा दिवस यात्रा भरण्यात येणार आहे.
यात्रे दरम्यान कुठलेही अनुचित घटना घडु नये याकरीता आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी/डाक च्या वतीने आरोग्य शिबीर व जनजागृती स्टॉल च्या माध्यमातुन आरोग्य सेवा देण्यात येत आहे. दिनांक 15 जानेवारी रोजी प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता भोयर यांनी आरोग्य स्टॉलला भेट देऊन दिल्या जात असलेल्या आरोग्य सेवेची पाहणी केली.त्यांचे सोबत तालुका आरोग्य सहाय्यक लिलाधर निपाणे समवेत प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी भारती बघेले, आरोग्य सेविका शिल्पा डोंगरे आरोग्य सेवक राहुल तिरकुले उपस्थित होते.
आरोग्य शिबिरातून किरकोळ आजारावर प्राथमिक उपचार दिले जात असुन विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व योजनेची जनजागृती करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी/डाक अंतर्गत कार्यरत सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ,आशा सेविका यांचे दिवस व रात्र पाळीत कामाचे उत्तम नियोजन करण्यात आलेले आहे.

तिरोडा तालुक्यात संक्रातीच्या पर्वावर चुरडी येथील श्रीक्षेत्र काशीघाट येथील यात्रेत प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी/डाक च्या वतीने दिवस व रात्र पाळीत आरोग्य शिबीर व जनजागृती स्टॉल च्या माध्यमातुन आरोग्य सेवा देण्यात येत आहे. यात्रेदरम्यान लोकांना आरोग्य विभागामार्फत आयुष्मान कार्ड व आभा कार्ड नागरिकांनी काढुन घेण्याबाबत जनजागृती वर भर देण्यात यावा व कार्यक्षेत्रातील गावांचे आयुष्मान कार्ड व आभा कार्ड हे दोन्ही कार्ड वर जनजागृती करण्याचे यावे. दोन्ही कार्ड वेगवेगळे असुन आयुष्मान कार्ड मुळे 5 लाखापर्यंत विमा संरक्षण मोफत मिळणार आहे 1356 आजारांवर आता शासनामार्फत निवड केलेले अंगिकृत दवाखान्यात मोफत उपचार मिळणार आहे. आता लाभार्थी स्वता आपल्या मोबाईलवर आयुष्मान अँप डाऊनलोड करुन आयुष्मान कार्ड काढु शकत आहे. तर आभा कार्ड मुळे एक प्रकारे लोकांच्या आरोग्यासंबंधीच्या वैद्यकिय ईतिहास माहितीचं खातं असणार आहे. यात आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारची माहिती नोंदवलेली असणार आहे. तरी दोन्ही कार्ड काढुन शासनाच्या आरोग्य योजनांचा फायदा घेण्यात यावा.अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य संस्थेतील वैद्यकिय अधिकारी किंवा आपल्या गावातील आशा सेविका यांच्याशी संपर्क साधावा.
– डॉ. संगीता भोयर,प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी,तिरोडा