गुमडोह महादेव पहाड़ीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार:जितेन्द्र कटरे

0
4

*मकरसक्रांतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

*गोरेगांव-सहारवाणी जिल्हा परिषद क्षेत्रातील गुमडोह हे क्षेत्र आदिवासी बांधवांच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे असून या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण आवश्यक ते सर्व प्रयत्न आपण करणार, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य व ओबीसी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष जितेंद्र कटरे यांनी केले.

तालुक्यातील नवरगांव येथील गुमडोह पहाड़ी येथे मकरसंक्रांति निमित्त दि.14 जनवरी 2024 रोजी आदिवासी विकास मण्डल नवरगांव, सुकपूर यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सुरुवातीला भगवान महादेव यांची पूजा अर्चना करून आदिवासी साकृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जिला परिषद सदस्य तथा गोंदिया जिला कांग्रेस कमेटी ओबीसी विभाग अध्यक्ष जितेंद्रभाऊ कटरे यांच्या अध्यक्षतेखाली तिरोड़ा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ राहंगडाले यांच्या के हस्ते करण्यात आले.

पुढे बोलताना जितेंद्र कटरे यांनी आदिवासी या देशाचा मूलनिवासी असून जल, जंगल,जमीनीच्या रक्षा करण्यासाठी आदिवासी समाज सदैव अग्रेसर राहत असून इतरांनी त्यांचेकडून शिकण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार विजय रहांगडाले यांनीही समयोचीत मार्गदर्शन केले व आपल्या निधीतून 10 लाख सभामंडपासाठी देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापति संजय टेंभरे, राष्ट्रवादी कांग्रेस युवा नेता रविकांत बोपचे, कुऱ्हाडी जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर, गोरेगांव पंचायत समिति उपसभापति राजकुमार यादव, गोंदिया शहर कांग्रेस अध्यक्ष जहिरभाई अहमद, कुऱ्हाडी पंचायत समिति सदस्य गणवीरताई, ग्राम पंचायत चिचगांव सरपंच भूमेश्वरीताई राहंगडाले, बोरगांव ग्राम पंचायत सरपंच चोपकरताई, तंटामुक्त समिति अध्यक्ष अशोक शेंडे, तुलसी मेश्राम, जगदीश मेश्राम, विनोद ठाकुर, उपसरपंच रमेश ठाकुर, माजी सरपंच दिनेश परतेती आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिनेश परतेति, संचालन अशोक शेंडे, व आभार प्रदर्शन जगदीश मेश्राम यांनी केले.कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे यांच्या हस्ते सार्वजनिक शौचालयाचे भूमिपूजन करण्यात आले.