लोकसभा निवडणूक लवकरच! 12 पोलिस अधिकाऱ्याच्या बदल्या

0
14

नागपूर, १६ जानेवारी: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे अनुषंगाने केंद्रीय निवडणुक आयोग व पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे अनुषंगाने नागपूर परिक्षेत्रांतर्गत निःशस्त्र पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांबाबत परिक्षेत्र पोलीस आस्थापना मंडळाची बैठक दि. १५.१.२०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ न. पोटकलम (२) अन्वये परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन पोलीस आस्थापना मंडळ यांनी दिलेल्या मान्यतेनेनुसार पोलीस निरीक्षक यांची प्रशासकीय कारणास्तव परिक्षेत्रांतर्गत खालीलप्रमाणे पदस्थापना करण्यात येत आहे.

अ.क्र निःशस्त्र पोलीस निरीक्षकांचे नाव सध्याचे नेमणुकीचे ठिकाण बदलीचा घटक
श्री. महेश मधुकरराव भोरटेकर नागपूर ग्रामीण वर्धा
श्री. संतापसिंह हिराांसह ठाकूर नागपूर ग्रामीण वर्धा
श्री. हेमंत कवलरामजी खरावे नागपूर ग्रामीण वर्धा
श्री. यशवंत सटवा कदम नागपूर ग्रामीण चंद्रपूर
श्री. प्रशांत वामनराव काळे वधा नागपूर ग्रामीण
योगेश शिवाजी कामाले वर्धा नागपूर ग्रामीण
दारासिंग दालत राजपुत वर्धा चंद्रपूर
धनाजी विठ्ठल जळक वर्धा चंद्रपूर
श्री. सुनिल विठ्ठलराव गाडे चंद्रपूर नागपूर ग्रामीण
१० सतिसिंह रणजितसिंह राजपूत चंद्रपूर नागपूर ग्रामीण
११ श्री. मनोज चांगोराव गभणे चंद्रपूर वर्धा
१२ श्री. रविंद्र मुक्ताराम शिंदे चंद्रपूर वर्धा