गोंदिया,दि.16-. महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन गोंदिया जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित सभा आज १६ जानेवारीला काॅ भोजराज रामटेके भवन रेलटोली गोंदिया येथे काॅ. शेखर कनोजिया यांच्या अध्यक्षतेखाली घेणयात आली. राष्ट्रीय कौन्सिल सदस्य काॅ हौसलाल रहांगडाले,राज्य सहसचिव कॉ कल्पना डोंगरे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी जिल्हा सहसचिव काॅ रामचंद्र पाटिल, जिल्हा सचिव काॅ प्रल्हाद उके यांनी मार्गदर्शन केले.काॅ हौसलाल रहांगडाले यांनी राज्य कार्यकारणी बैठकीचा रिपोर्ट सादर करीत राज्य कार्यकारणीने शेतमजुर मनरेगा आवास,शिक्षण,पेन्शन लागू करण्याच्या आदि मागण्यांना घेऊन 25 जानेवारीला मोर्चा धरणे आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.बैठकीला दुलीचद कावडे,जितेंद्र गजभिये,घनश्याम गजभिये,क्रांति गनवीर,नत्थू मडावी,प्रकाश चौरे,शामराव पंधराम, इशराईल शेख, राजेश वैद्य आदि उपस्थित होते.