आमगाव,दि.18ः’देणाऱ्याने देत जावे ,घेणाऱ्याने घेत जावे.घेता घेता एक दिवस देणाऱ्याचा हात व्हावे’ या कृतज्ञ भावनेतून भूपेंद्र भागवत तुरकर (निवृत्त संचालक दूरदर्शन केंद्र ,नागपूर )यांनी दरवर्षीप्रमाणे दातृत्वाची परंपरा कायम राखत यावर्षीही जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ,तिगाव येथील विद्यार्थ्यांना टी-शर्ट वाटप करून शाळेप्रती व गावाप्रती कृतज्ञभाव व्यक्त केला.
कुंजनकुमारजी तुरकर (सरपंच ग्रा. पं. तिगाव ) यांचे अध्यक्षतेत हा सोहळा पार पडला.प्रमुख अतिथी म्हणून दानदाते भूपेंद्र तुरकर,सौ.अंजूताई तुरकर,हेमंत शेंडे(अध्यक्ष शा.व्य.स.),कु.सुलभाताई पाऊलझगडे (मुख्याध्यापिका),संदीप तिरेले (उपसरपंच), अशोक कटरे (उपाध्यक्ष शा. व्य. स.)चोपलाल तुरकर, ओमप्रकाश पटले, सौ. वर्षा बोपचे उपस्थित होते.
भागवत फाउंडेशन तिगावचे संयोजक भूपेंद्र तुरकर यांनी विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून शाळेचे व गावाचे नावलौकिक करावे असा संदेश दिला .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ए.एस.येरणे,सौ.वाय.एस.वानखेडे,कु.एल.आर.भोयर, कु.यू.आर.रकटे यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे संचालन आर. के.बागडे यांनी केले तर आभार एस. एस .कामडी यांनी मानले