इलेक्ट्रोहोम्योपेथीच्या समस्या मार्गी लावणार -आमदार मनोहर चंद्रीकापुरे

0
15

गोरेगांव-  जगत महाविद्यालय गोरेगांव येथे मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोम्योपेथी व्दारा,डॉ काउंट सिझर मैटी यांची २१५ वी जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोहर चंद्रीकापुरे होते.त्यांनी इलेक्ट्रोहोम्योपेथी ही विषविरहीत,प्रभावी गुण दाखविणारी औषधी आहे.साध्य व असाध्य रोग बरे होतात, अशा चांगल्या पेथीला शासनाकडुन लवकरच मान्यता मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करीत इलेक्ट्रोहोम्योपेथीच्या वैद्यकीय व्यवसायीकांची समस्या शासन स्तरावर लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
जिल्हाध्यक्ष डॉ.के.जी.तुरकर यांनी प्रास्तविक केले.दिपप्रज्वलक व उदघाटक म्हणून डॉ.दर्पण चौधरी उपस्थित होते.यावेळी  डॉ.विरेन्द्र दिक्षित,डॉ.अजय बिरनवार,डॉ.पराग जयपुरिया,डॉ.निधी जयपुरिया,डॉ.संतोष येवले,डॉ.बी.एम. पटले,डॉ.सी.एच.भगत,ऐड.एस.डी.बागड़े,डॉ.योगेश हरीणखेड़े,डॉ.के.बी.राणे,डॉ.पी.एस.लंजे,डॉ.दिपक बहेकार,डॉ.आशिष पटले,डॉ शिवा सोनवाने,डॉ गणेश बिसेन,डॉ सुखदास तरोणे डॉ सचिन केलनका,डॉ सृष्टि केलनका,डॉ शुभम पटले उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, डॉ विद्यालाल रहांगडाले, डॉ संदीप तुरकर, डॉ एच.आर.चौधरी, डॉ. वाघमारे, डॉ. बडोले, डॉ. अनिल सुर्यवंशी, डॉ.वासुदेव चौधरी, डॉ.घनश्याम कटरे, डॉ.श्रिपात्रे, डॉ.भोयर,डॉ.इंद्रराज बघेले, डॉ.सुरेंद्र कटरे,डॉ.सोनु चौधरी,डॉ.येळे,कृष्णा पटले,अतुल देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले, तर मंच संचालन डॉ योगेश हरीणखेड़े यांनी केले व आभार डॉ ओमप्रकाश भैरम यांनी मानले.