संस्थेच्या उपविधीनुसार सर्वन तलावाची सीमा भडंगाच्या सरहद्दीत- मनसु मारबदे

0
7

गोरेगाव,दि.18- 97 वी घटनादुरुस्ती मुळे सहकारी कायद्यातील बदलांनव्हे नवीन स्वीकारलेल्या उपविधीनुसार सर्वन तलावाची सीमा गोरेगाव तालुक्याच्या सर हद्दीत असल्याची माहिती विशाल मत्स्यपालन सहकारी संस्था मर्यादित भडंगा रंनं 209 चे वरिष्ठ पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ता सावलराम मनसु मारबदे यांनी दिली.17 जानेवारी रोज बुधवारला  पंचायत समिती गोरेगावचे खंडविकास अधिकारी एच.डी.गौतम यांच्या दालनात विशाल मत्स्यपालन सहकारी संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मनसू मार्बदे यांचे नेतृत्वाखाली सदर समस्येचे तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली.यावेळी सादर केलेल्या आखीव पत्रिका नकाशा व अन्य पुराव्यानुसार व संस्थेच्या उपविधीनुसार सर्वन तलावाची सीमा ही भडंगा गावच्या सरहद्दीत असल्याची माहिती मनसु मारबदे यांनी दिली.याविषयी जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून आपण योग्य ती माहिती तत्काळ उपलब्ध करून घ्यावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे मारबदे यांनी खंड विकास अधिकारी श्री गौतम यांना सांगितले. याविषयी खंडविकास अधिकारी श्री गौतम यांनी सांगितले की तत्कालीन व्हिडिओ अजित सिंग पवार यांच्या कार्यकाळापासून सदर प्रकरण सुरू असून या प्रकरणाविषयी मला माहिती नाही.आपण आपसी समन्वय साधून मधला मार्ग तोडगा काढण्याचे निर्देश सदर संस्थेच्या सभासदांना दिले.सदर संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावे भडंगा पिडंकेपार,जांभूळपाणी,कमरगाव या गावापुरते मर्यादित असून या गावातील गाव तलाव भंडगा व नवीन लावण्या तलाव भडंगा,पिंडकेपार तलाव, जांभूळपाणी तलाव, कमरगाव , लंबा तलाव कमरगाव व सर्वन तलाव भडंगा या सरहद्दीत मर्यादित असल्याचे सहाय्यक निबंध सहकारी संस्था दुग्ध भंडारा यांच्या परिपत्रकात नमूद असल्याचेही मनसू मारबदे यांनी चर्चेच्यावेळी खंडविकास अधिकारी श्री गौतम यांच्या निदर्शनास आणून दिले.यावेळी  विशाल मत्स्यपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष सहेशराम मेश्राम, सचिव बाळकृष्ण मेश्राम, वरिष्ठ पदाधिकारी सावलराम मनसु मारबदे, टंटू मेश्राम, लंकेश मेश्राम, परमानंद मेश्राम, नन्हीलाल मांढरे, माणिक मेश्राम, उमेश मेश्राम, हंसराज चाचरे, शोभेलाल मेश्राम व अनेक समाज बांधव यावेळी उपस्थित होते.