“प पू श्रीमद टेंबे स्वामी महाराज विरचित श्री दत्त स्तोत्रांचे सामूहिक हवन-पठण कार्यक्रमाचे गोंदिया शहरात आयोजन”

0
6

गोंदिया,दि.18-दत्त संप्रदायातले श्रेष्ठ संत श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अर्थात श्रीमद टेंबे स्वामी महाराज ह्यांची अनेक स्त्रोत्र आणि पदं प्रसिद्ध आहेत.अनेक साधक ह्या स्त्रोत्रांचे नित्य पठण करत असतात हयापैकी एक अत्यंत शक्तिशाली आणि मंत्रसिद्ध स्त्रोत्र म्हणजे “(अ)घोरकष्टोद्धरण स्त्रोत्र ”.श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना उद्देशून रचलेले हे स्त्रोत्र ‘संकटनाशन स्त्रोत्र’ किंवा ‘सिद्ध मंगल स्तोत्र’ म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या स्त्रोत्राचे सामूहिक पठण विशेष लाभदायी समजले जाते.

बदलापूरचे ब्रह्मलीन सद्गुरू श्री वासुदेव बापट गुरुजी भक्त परिवार,तसेच गोंदिया येथील श्री गजानन महाराज मन्दिर ट्रस्ट,सिविल लाईन्स व श्री विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने,सामूहिक श्रीदत्त स्त्रोत्रपठणाचा आणि हवनाचा कार्यक्रम एकादशीच्या निमित्ताने, श्री गजानन महाराज मन्दिर , मिलन हॉल जवळ, सिव्हील लाईन्स , गोंदिया येथे शनिवार ,दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४ ते ८ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

हयाप्रसंगी नामस्मरण ,नामजप, स्तोत्र पठण, सामूहिक हवन, यज्ञ संस्था तसेच स्तोत्रांचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, सामूहिक स्त्रोत्रपठण, सद्गुरूपरिचय असा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.कार्यक्रम स्थळी आध्यात्मिक ग्रंथ प्रदर्शनही आयोजित केले आहे.ह्या विशेष कार्यक्रमाचा सर्व गोंदिया येथील भक्तमंडळींनी लाभ घ्यावा असे संयोजक मंडळाने आवाहन केले आहे. संपर्क (9309884733 ,9422133144,9326812465)