१ कोटी ४९ लक्ष रुपयांच्या निधीतून गावांतर्गत मूलभूत सुविधा निर्माण करण्यात येणार
अर्जुनी/मोर- विधानसभा क्षेत्रातील गावांतर्गत नागरिकांच्या मूलभूत व अत्यावश्यक गरज पाहता लेखाशीर्ष २५१५,३०५४ अंतर्गत १ कोटी ४९ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा राज्याचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते परिसरातील गणमान्य नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. क्षेत्रातील इटखेडा, महालगाव, तांडगाव, झरपडा, सिरोली, महागाव, मांडोखाल, अरुणनगर, गौरनगर या गावांमध्ये मूलभूत सुविधा जसे गावांतर्गत रस्ते, सभामंडप, नाली बांधकाम निर्माण करण्यात येणार असून माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी गरज पडल्यास आणखी निधी मंजूर करवून घेणार असल्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. ग्रामस्थांशी संवाद साधताना माजी मंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, केंद्र शासनाच्या विविध विकास कामांचे व राज्य शासनाच्या विविध ध्येय-धोरणाचे विवेचन करून पुरोगामी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनबद्ध निर्देशानुसार विकासकामाचा आलेख वेगाने वाढत आहे. निधी मंजूर केल्याबद्दल माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राज्य शासनाच्या प्रती आभार व्यक्त केले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विजय कापगते, जिल्हा परिषद सदस्य पोर्णिमाताई ढेंगे, पंचायत समिती उपसभापती होमराज पुस्तोडे, माजी सभापती श्री.उमाकांत ढेंगे, डाॅ.गजानन डोंगरवार, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष रामचंद्र देशमुख, माजी जि.प. सदस्य श्री.रामदास कोहाडकर ,पंचायत समिती सदस्य डाॅ.नाजुक कुंभरे, पंचायत समिती सदस्य भागयश्रीताई सयाम, होमराज ठाकरे, मुरारी घोडेस्वार,मुरलीधर ठाकरे,.रमेश मस्के, अनिल देशमुख, नितीन नाकाडे, गोपाल शेन्डे, नंदकुमार गहाणे, ईश्वर खोब्रागडे, इटखेडा ग्रा.प.संरपच आशाताई झिलपे, महालगाव ग्रा.प.संरपच मिनाताई शहारे, झरपडा ग्रा.प.संरपच मनोज भालकांडे, तांडगाव ग्रा.प.संरपच गनिताताई नाकाडे, सिरोली ग्रा.प.संरपच श्री.नाजुक लसुंते, महागाव ग्रा.प.संरपच प्रभाकर कोवे, अरुणनगर ग्रा.प.संरपच मिनती किर्तनिया, गौरनगर ग्रा.प.संरपच श्री.बिकास बैघेसह सर्व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.